जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे अर्थकारण असते. राजकीय, सामाजिक पटलावर घडत असलेल्या कोणत्याही लहान किंवा प्रचंड मोठय़ा घटनेमागे असते ते अर्थकारण. मग माणसाच्या एवढय़ा निकट असलेले पर्यावरण यातून कसे सुटणार.. त्यातच अर्थकारणापायी पर्यावरणातील विविध घटकांवर होणारा परिणाम पाहता या दोघांमध्ये शत्रुत्वाचे नाते आहे असाच समज दृढ होतो. अर्थकारणाचा आणि पर्यावरणाचा नेमका संबंध काय, ही दोन टोके आहेत की नाण्याच्या दोन बाजू, शेती-उद्योग-शहरीकरणाच्या आड पर्यावरण येते का, विकसनशील देशांची प्रगती रोखण्यासाठी पर्यावरणीय असंतुलनाचा बागुलबुवा उभा केला जातो का, जागतिक तापमानवाढ, कार्बन उत्सर्जन या संकल्पना किती खऱ्या किती खोटय़ा.. अशा अनेक प्रश्नांचा गुंता पर्यावरणाचा साकल्याने विचार करणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. हा गुंता सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या विषयातील तज्ज्ञ ‘लोकसत्ता’च्या बदलता महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत होत असलेल्या ‘आपण आणि पर्यावरण’ या परिषदेत करणार आहेत. लोकसत्ताने टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या सहकार्याने ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या या परिषदेला रिजन्सी ग्रुप आणि केसरीचीही मदत मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा