मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीत अटक केली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) गैरव्यवहार आणि दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात ‘ईडी’ने पांडे यांची अनेक वेळा चौकशी केली होती. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ‘ईडी’ तपास करत आहे. या प्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आह़े
याआधी ‘ईडी’ने ‘एनएसई’च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. चित्रा रामकृष्ण यांना ‘ईडी’ने अटक केली होती. पांडे यांची दिल्ली ‘ईडी’ने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. पांडे यांच्या अटकेच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
पाहा व्हिडीओ –
संजय पांडे यांनी २००१ साली पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती. त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर व्हावे लागले. त्यावेळी २००६ मध्ये त्यांनी कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. या कंपनीला २०१० ते २०१५ या कालावधीत एनएसई सव्र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात ‘एनएनई’मध्ये गैरव्यवहार झाला होता. याशिवाय आरोपींनी २००९ ते २०१७ या कालावधीत भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून ‘एनएसई’ कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. दूरध्वनी अभिवेक्षण करण्याच्या कामासाठी आरोपी कंपनीला अंदाजे ४ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप आहे.
सीबीआयने संजय पांडेंसह चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी देशभरातील १८ ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी छापे घातले होते. या गुन्ह्यांच्या आधारे ‘ईडी’नेही चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.