मुंबई : मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून १२०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोन आरोपींना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अहमदाबाद विमानतळावरून अटक केली. मुख्य आरोपी हे मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याचे साथीदार असून ते दुबईला पळण्याचा प्रयत्न करत होते.

हा गैरव्यवहार १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय आहे. बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकाच्या मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सूरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

mobile toilets burnt loksatta news
मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Central Railway extends Kurla Elevated Harbor Line project deadline
कुर्ला उन्नत हार्बर मार्गाचे स्वप्न आणखी एक वर्ष लांबणीवर
Emotional video of a kid selling coconuts from boat hardworking child video viral on social media
जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
loksatta lokankika
सर्वोत्कृष्ट एकांकिकांचा आज नाट्योत्सव, उरणमधील जेएनपीएच्या सभागृहात सादरीकरण
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
climate turmeric impact loksatta
हवामान प्रकोपाचा हळदीला फटका; जाणून घ्या, देशभरात लागवड किती घटली, उत्पादनात किती घट येणार
decrease in Mumbai s minimum temperature maximum temperature
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

हेही वाचा…प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे सुतोवाच

या प्रकरणात राजकीय पक्ष व व्यक्तीच्या सहभागाबाबतही ईडी तपास करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमन याने नाशिकमधील दोन बँकांमध्ये सुमारे १४ खाती उघडली होती. त्यातील गैरव्यवहाराप्रकरणी मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले होते. तसेच या बेहिशोबी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा…लाच मागितल्याप्रकरणी मुकादमाला अटक

आरोपी सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. त्यात नागरिकांच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांनी शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असून त्याच्या संपर्कात असलेल्या शफीमिय़ा आमीरमिया शेख व मोहसन अहमद मुस्ताक अली खिलजी या दोघांना ईडीने अटक केली. आरोपी मुख्य आरोप मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याचे साथीदार असून ते दुबईला पळण्याचा प्रयत्न करत होते. ईडीने त्यांच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी केल्यामुळे त्यांना अहमदाबाद विमानतळावर थांबवण्यात आले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मुंबईत आणले. आरोपी सध्या ईडी कोठडीत आहेत.

Story img Loader