जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal ED Arrested) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा ईडीने गोयल यांना अटक केली आहे. कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात काय घडलं?

जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध नव्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीच्या या कारवाई दरम्यान ईडीने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती. आता नरेश गोयल यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. आता आपण जाणून घेऊ की कॅनरा बँकेचं घोटाळा प्रकरण काय आहे?

Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक…
MNS manifesto Raj Thackeray , Raj Thackeray news,
परराज्यातून होणारी घुसखोरी रोखणार, मनसेच्या जाहीरनाम्यात आश्वासन
shiv sena leader aditya thackeray hit bjp for favouring gujarat in loksatta loksamvad event
गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
ubt leader aditya thackeray in loksatta loksamvad event for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
dharavi protestors give preference to toilets
धारावी बचाव आंदोलनकर्त्यांचा वचननामा जाहीर, शौचालयाला प्राधान्य
dadar mahim vidhan sabha
दादर – माहीम विधानसभेत भाजपचा मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा ? भाजपच्या महिला विभाग अध्यक्षच्या फेसबुक पोस्टमुळे उलटसुलट चर्चांना उधाण
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित

सीबीआयच्या खटल्याच्या आधारे दाखल करण्यात आला गुन्हा

नरेश गोयल यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा सीबीआयने ३ मे रोजी दाखल केलेल्या खटल्याच्या आधारावर करण्यात आला आहे. नरेश गोयल यांना आता न्यायालयात हजर करण्यात येईल. नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यासह अनेकजण कॅनरा बँक फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत. जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपन्यांपैकी एक होती. मात्र २०१९ मध्ये जेट एअरवेजने नगदी संकटाचा हवाला देत त्यांचे ऑपरेशन्स स्थगित केले होते.

फसवणुकीचं नेमकं प्रकरण काय?

कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर २०२२ ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.  कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले होते. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले. याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.