अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर बुधवारी पहाटे प्रवीण राऊत यांना अटक केली. एक हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. अटक प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता.

एचडीआयएलमधील एक हजार ३४ कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर आता प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रविण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून संजय राऊत  यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि याचे पुरावे ईडीला मिळाले होते. त्यामुळे ईडीकडून अद्याप याप्रकरणी तपास सुरु आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

प्रवीण राऊत यांना मुंबईपासून जवळ असलेल्या फलघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटमध्ये मोठा व्यवसाय आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रवीण यांच्या घराची झडती घेतली आणि त्यांना दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील झोन कार्यालयात चौकशीसाठी आणले. प्रवीण यांनी तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने अनेक तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक केली.

हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (डीचआयएल) ची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनला म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने एफएसआय फसवणूक करण्यात मदत केल्याबद्दल ईडी प्रवीण राऊत यांची चौकशी करत आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर येथील पत्रा चाळीचा काही वर्षांपूर्वी गुरुआशिष कन्स्ट्रक्शनने पुनर्विकास करण्याचे काम मिळाले होते. पण काही वर्षांपूर्वी चाळीतील रहिवाशांसाठी सदनिका न बांधता १,००० कोटी रुपयांचा एफएसआय फसवणूक करून विकला होता.

फसव्या एफएसआय व्यवहारासाठी प्रवीण हे गुरुआशिष कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी आणि एचडीआयएलच्या संपर्कात होते. प्रवीण यांनी एचडीआयएलच्या प्रवर्तकांना मनी लॉन्ड्रिंगमध्येही मदत केली. गेल्या वर्षी, ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांची प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरीसोबतच्या भागीदारीबाबत चौकशी केली होती.

प्रवीण राऊत यांनी माधुरी यांनी १.६ कोटी रुपये दिले होते. या रकमेपैकी माधुरी राऊत यांनी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये व्याजमुक्त कर्ज म्हणून हस्तांतरित केले. ही रक्कम दादर (पूर्व) येथे फ्लॅट खरेदीसाठी वापरण्यात आली. वर्षा आणि माधुरी या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार असल्याचे तपासात पुढे आले आहे. यापूर्वी वर्षा यांनी ईडीला सांगितले की, त्यांनी माधुरी राऊत यांचे ५५ लाखांचे कर्ज फेडले आहे.

२०२० मध्ये, ईडीने या प्रकरणात प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग यांनी फसवणूक करून कर्ज घेऊन पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेचे ६,११८ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. ईडी पीएमसी-एचडीआयएल फसवणुकीशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे ज्यामध्ये एजन्सीने २०१९ मध्ये पिता-पुत्र दोघांना अटक केली होती.

Story img Loader