मुंबई : फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व गुजरातमधील आठ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, बँकेतील पैसे व चांदी अशी चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत ११७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हलक्क भंग केल्याप्रकरणी २०२३ मध्ये फेअरप्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी मुंबईसह गुजरातमधील कच्छ येथे छापे मारण्यात आले आहेत. यापूर्वी याप्रकरणी तक्रारदार ‘वायकॉम १८ नेटवर्” कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या ॲपसाठी ४० कलाकारांनी जाहिरात केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने ऑक्टोबर, २०२३ मध्ये रॅपर बादशाहची चौकशी केली होती. या संपूर्ण गैरव्यवहारामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

High Court denied interim relief to LIC on appointment of staff for assembly election work
सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांसाठी कुलिंग कालावधीची अट ठेवू नका, उच्च न्यायालयाची कौटुंबिक न्यायालयांना सूचना
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mumbai polcie arrested 20 year old youth for threatening Zeeshan Siddiqui and actor Salman Khan
झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक
High Court denied interim relief to LIC on appointment of staff for assembly election work
पॅरोलसाठी कैद्याला दीड वर्ष वाट पाहण्यास सांगणे अतार्किक : अर्ज फेटाळण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
mumbai On Diwali citizens should take care of children and burst firecrackers till 10 pm bmc made suggestions
आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी क्रमांक १०१ व १९१६ वर संपर्क साधावा, मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
shaina nc joins eknath shinde shivsena
भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर; १२ तासांच्या आत सगळं घडलं!
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द

हेही वाचा…भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर; १२ तासांच्या आत सगळं घडलं!

u

फेअर प्ले ॲप महादेव ॲपशी संबंधित बेटिंग ॲप असून महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी सुमारे २०० कोटी रुपये रोख खर्च केले होते. दुबईमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्यात अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्याने तेथे सादरीकरण केले होते.

महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे अटक करण्यात आली. सध्या तो स्थानिक यंत्रणांच्या ताब्यात आहे. गेल्या वर्षभरापासून चंद्राकरच्या अटकेसाठी ईडी प्रयत्न करीत होती. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने युएई प्राधिकरणासोबत चर्चा सुरू होती. आता चंद्राकरच्या प्रत्यर्पणासाठी ईडी प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा…विमानात बॉम्बच्या धमकीप्रकरणी आतापर्यंत १२ गुन्हे दाखल

यापूर्वीच महादेव ॲपचा आणखी एक प्रवर्तक रवी उप्पल यांना यूएई अधिकाऱ्यांनी इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर अटक केली होती. त्यानंतर ईडीने त्याच्या प्रत्यार्पणासाठी सक्षम अधिकाऱ्यामार्फत विनंती पाठवली आहे. उप्पल आणि चंद्राकर यांनी त्यांचे भारतीय पारपत्र रद्द केले असून सध्या ते वानुआटु देशाचे नागरिक आहेत.

हेही वाचा…वांद्रे टर्मिनस चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी सुरू

आरोपी महादेव ॲपद्वारे बेकायदा बेटिंग करीत होता. त्यातील कमाई कूट चलन, हिऱ्यांचा व्यापार, शेअर बाजार आणि परदेशातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवली आहेत. डिसेंबरमध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार, आरोपी महादेव बुक ॲप, रेड्डी अण्णा बुक, फेअर प्लेच्या माध्यमातून दरमहिना ४५० कोटी रुपये कमवत होते. या संपूर्ण प्रकरणामुळे छत्तीसगडमधील राजकारणही तापले होते. हा सर्व व्यवहार स्पेन, दुबई, रशिया आणि पाकिस्तान येथील प्रवर्तकांमार्फत चालवला जातो. त्यात अंडरवर्ल्डचाही समावेश आहे. हा संपूर्ण गैरव्यवहार १० हजार कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे.