मुंबईः बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यासह पाच जणांविरोधात मंगळवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. कॅनरा बँकेचे ५३८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने १ सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली होती.

हेही वाचा >>> मुंबई: साडेपाच कोटींच्या हिऱ्यांच्या अपहाराप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

Three arrested in mephedrone production case in Vita
विट्यातील मेफेड्रोन उत्पादन प्रकरणी तिघांना अटक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
Tahawwur Rana Extradiction
Tahawwur Rana Extradiction: मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Ghatkopar hoarding collapse case No bail for accused Arshad Khan
घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण : आरोपी अर्शद खानला जामीन नाहीच
Ram Gopal Varma convicted in cheque bounce case
राम गोपाल वर्मा यांना कोर्टाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं काय घडलं?

याप्रकरणी कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढ्या रकमेचे बँकेचे नुकसान झाले. त्यामुळे बँकेद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली सीबीआयने भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (२), १३ (१) (क) व १३ (१) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत असून नरेश गोयल, त्याची पत्नी अनिता व चार कंपन्यांविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : बोरिवलीमधील इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा

ईडीच्या तपासानुसार १० बँकांच्या समुहाचे सुमारे ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवण्यात आले आहे. न्यायवैधक लेखापाल परीक्षणात सल्लागार आणि व्यावसायिक शुल्काच्या नावाखाली सुमारे एक हजार १५२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे दोन हजार ५४७ कोटी ८३ लाख रुपये जेट लाईट लिमिटेड या कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या काही वर्षांत नऊ कोटी ४६ लाख रुपये नरेश गोयल यांच्या कुटुंबियांना देण्यात आले. त्यात गोयल यांची पत्नी अनिता गोयल, मुलगी नम्रता गोयल व मुलगा निवान गोयल यांच्या समावेश आहे. २०११-१२ ते २०१८-१९ या काळात विविध कारणे देऊन ही रक्कम कंपनीतून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे परदेशातील काही कंपन्या, तसेच गोयल कुटुंबियांच्या मालमत्ता याबाबत ईडी तपास करत आहे.

Story img Loader