मुंबई : एका मूत्रिपडावरही सामान्य जीवन जगता येते. लोक दोनपैकी एक मूत्रिपड दान करून एका मूत्रिपडावरही सामान्य आयुष्य जगतात. तसेच ताण सगळय़ांनाच असतो. त्यामुळे या दोन कारणांस्तव वैद्यकीय जामीन दिला जाऊ शकत नाही, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाला विरोध करताना उच्च न्यायालयात केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक मूत्रिपड निकामी झाले असून दुसरे ६० टक्केच कार्यरत असल्याचा दावा मलिक यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच याच कारणास्तव आपल्या स्थितीचा सहानुभूतीपूर्व विचार करावा आणि या प्रकरणाचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची मागणी मलिक यांच्यातर्फे करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा तपशीलवार युक्तिवाद ऐकल्यानंतर मलिक यांच्या वैद्यकीय जामिनावरील निकाल राखून ठेवला.  कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र मूत्रिपडाच्या उपचारांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून ते कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.