मुंबई : अश्लील चित्रफीत निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ हिची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी केली. गहना हिची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली. त्यानंतर, तिला घरी जाण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी, मंगळवारीही तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीतर्फे देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं

ईडीने बजावलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर गहना सोमवारी सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाली. अश्लील चित्रफीत निर्मितीच्या आरोपांप्रकरणी उद्याोगपती राज कुंद्रासह गहना हिचे नाव पुढे आले आहे. गेल्या आठवड्यात गहनाच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. त्यावेळी, तिचे दोन भ्रमणध्वनी आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. तसेच, तिची सात बँक खातीही गोठवण्यात आली होती. अश्लील चित्रफीत निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी राज कुंद्रा यालाही ईडीने दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, दोन्ही वेळेला तो ईडीसमोर उपस्थित राहिला नाही. गेल्या आठवड्यात गहना हिलाही ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed questioned actress gehana vashisht in pornography case mumbai print news zws