मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मे. स्पेक्ट्रा इंडस्ट्रीज लि. व इतरांविरोधातील बँक फसवणुकीप्रकरणात मुंबई व औरंगाबाद येथील ९ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. या छाप्यात बँकेतील रक्कम, मुदत ठेवी, शेअर्स अशी आठ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली.

बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहेत. याप्रकणात स्पेक्ट्रा इंडस्ट्रीज लिमिटेड, जयदेव विनोद गुप्ता, शीला विनोद गुप्ता आणि इतरांनी बँकांच्या समुहाची २७ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कट रचून बँकांचे आर्थिक नुकसान केले.

हेही वाचा…निवडणुकीच्या निकालानंतर बेकायदा फलकबाजी केली जात असताना काय करत होता ? उच्च न्यायालयाचा महापालिका प्रशासाला प्रश्न

तसेच ती रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. याबाबत सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी बनावट खरेदी दाखवून बनावट आर्थिक नोंदी केल्या गेल्या, असा आरोप आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.

Story img Loader