मुंबई : मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सूरत आणि अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्यांशी संबंधित २४ ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात बँक खाती आणि १२५ कोटी रुपयांचा गैरवापर वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हॅरुन मेमनने एकापेक्षा जास्त बँक खाती उघडल्याशी संबंधित छापे टाकण्यात आले आहेत. मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सकाळी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवयहार असे म्हटले आहे. तसेच या बेनामी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी मालेगाव पोलिसांकडे या आरोपांसाठी तक्रार केली आहे. सिराज मोहम्मदच्या २४ बेनामी बँक खात्यांसह मालेगाव, नाशिक येथील दोन बँकांमध्ये पोलीस, ईडी, प्राप्तिकर विभाग, आरबीआय, निवडणूक आयोग तपास करीत आहेत, असे त्यांनी ‘एक्स’ या समाज माध्यांवर पोस्ट करण्यात आले आहे.

Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Amit thackeray and mitali thackeray
Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

मालेगाव पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी सिराज विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कारवाई सुरू केली आहे. मालेगावमधील ११ स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिराजवर गंभीर आरोप असून त्याला अटकही करण्यात आली आहे. सिराज बँक खात्यांचा वापर निवडणुकीसाठी करीत असल्याचा आरोप आहे. सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. यामध्ये नागरिकांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून त्यांनी शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते.

सिराजने त्याने कृषी व्यवसायासाठी बँक खाती उघडण्यासाठी समजावले होते. त्याबदल्यात त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते, असे तक्रारदार जयेश मिसाळ यांनी पोलिसांना सांगितले. सिराजने मिसाळ यांच्याप्रमाणेत इतर ११ जणांची बँकेत खाती उघडली होती. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे आणि ते अन्य खात्यात वळविण्यात येत असल्याचे नंतर मिसाळ आणि अन्य खातेदारांच्या लक्षात आले. या प्रकाराचा मिसाळ आणि इतर खाताधारकांना धक्का बसला. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. सिराजने आपल्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!

गेल्या दोन महिन्यांत दहा ते बारा बँक खाती उघडण्यात आली होती. ‘ईडी’ने या खात्यांमधील व्यवहारांची माहिती घेतली, तेव्हा त्यात १२५ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले. निवडणुकीसाठी या रकमेचा वापर होत असल्याचा आरोप असून याबाबत ‘ईडी’ तपास करीत आहे.