सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आज मुंबईमधील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात आल्यात. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे.

१९८० च्या दशकामध्ये भारतसोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक केलीय. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल २९ वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आलीय.

मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा दाऊत इब्राहिमने डोंगरीमधून आपल्या गुन्हेगारी क्षेत्रातील हलचालींना सुरुवात केली. डोंगरीमध्ये त्याची ओळख हाजी मस्तानच्या गँगशी झाली आणि तिथूनच मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉरचा कालावधी सुरु झाला. १९८० दरम्यान दाऊदला एका चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेली. नंतर त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. हाजी मस्तान आणि पठाण गँगदरम्यानच्या वादामुळे दिवसोंदिवस दाऊद अधिक धोकादायक झाला. पठाण गँगमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांचा समावेश होता. नंतर याच गँगवॉरमधून आणि वादामधून मुंबईवर आपली दहशत निर्माण व्हावी या हेतूने दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.