मुंबई : व्हीआयपीस् ग्रुप – ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्याशी संबंधित २४ कोटी ४१ लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालयानाय (ईडी), मुंबईने टाच आणली आहे. त्यात ५८ बँक खात्यांमधील २१ कोटी २७ लाख रुपये व तीन कोटी १४ लाख रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. यापूर्वी मार्च महिन्यात खुटे यांच्या दुबईतील ३७ कोटी ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्याबाबत ईडीकडून आदेश जारी करण्यात आले होते.

सामान्य नागरिकांची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
Shiv Nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news
शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर उद्योगपती; आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांचे दातृत्व
Two prestigious awards for GP Parsik Bank
जीपी पारसिक बँकेला दोन प्रतिष्ठित पुरस्कार

हेही वाचा…दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

चांगला परतावा देण्याच्या नावाखाली गुंतवणूक योजना व ट्रेडिंगमध्ये आमिष दाखवून आरोपींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमांतून विविध बँक खात्यात गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. याप्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दुबईत वास्तव्याला असलेला विनोद खुटे हा याप्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने दुबईस्थित कंपनी मेसर्स काना कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट सेवा, फॉरेक्स ट्रेडिंच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे.

विनोद खुटेने मेसर्स व्हीआयपीस् व्हॉलेट प्रा.लि.सह व्हीआयपीस् ट्रेड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स काना कॅपिटल्स लिमिटेड, मेसर्स ग्लोबल एफिलिएट बिझनेस, व्हीआयपीस् सिक्युरिटीज आणि व्हीआयपीस् प्रॉपर्टीज अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या. त्यामार्फत गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा केली. ती रक्कम बनावट कंपनी व खात्यांच्या माध्यमतून व्यवहारात आणण्यात आली. त्यानंतर हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून पैसे भारतातून दुबईत पाठवण्यात आले.

हेही वाचा…बोरिवलीतील उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, पोयसर जिमखाना संस्थेला महानगरपालिकेची नोटीस

हे व्यवहार तपास यंत्रणाच्या नजरेत येऊ नये यासाठी यूएसडीटी सारख्या कूट चलनाचा वापर करण्यात आला. आतापर्यंत विनोद खुटेने केलेल्या खर्चाचा तपशील ईडीने तपासला असता गुन्ह्यातील रक्कम १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. या रकमेतून दुबई व भारतात मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ईडीने विनोद खुटे याच्याशी संबंधित पुणे, अहमदाबाद, मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले होते. तसेच मार्च महिन्यात दुबईतील ३७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. याप्रकरणी एकूण ६१ कोटी ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.