मुंबई : करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या पिशव्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) माजी महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांना समन्स बजावले आहे. वेलरासू यांना मंगळवारी, तर पेडणेकर यांना बुधवारी चौकशीला बोलावण्यात आहे. त्यांना बेलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेने ८ मार्च २०२० मध्ये मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्यांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा >>> बांधकाम साहित्य वाहतुकीवर बंदीचा न्यायालयाचा इशारा; चार दिवसांत हवेचा दर्जा न सुधारल्यास आदेश देण्याचे सुतोवाच  

shilphata road cash 5 crore rupees seized
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत

सर्व पाहणी केल्यानंतर १६ मार्च रोजी वेदान्त इनोटेक प्रा. लि. कंपनीला ६ हजार ७१९ रुपये प्रति पिशवीप्रमाणे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ११ मे रोजी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी वेदान्तसह आणखी एका कंपनीला अंतिम करण्यात आले होते; पण त्यावेळी  पेडणेकर यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला भायखळा येथील बंगल्यावर बोलावून वेदान्त इनोटेकलाच कंत्राट देण्यास सांगितले, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने जबाबात सांगितले आहे. त्याच्याच आधारे आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीनेही नुकताच गुन्हा दाखल केला होता.