मुंबई : खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. समन्समध्ये गवळी यांना ५ मे रोजी ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान प्रकरणात ईडीला त्यांची चौकशी करायची आहे. यापूर्वी तीनवेळा त्यांना ईडीने समन्स बजावले होते, पण अधिवेशन व आजारपणामुळे त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या. ईडीच्या माहितीनुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ही ट्रस्ट त्यांनी कंपनी कायदा कलम ८च्या अंतर्गत कंपनीत रूपांतरित केले होते. त्यात खोटय़ा कागदपत्रांचा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या तपासानुसार या प्रकरणात बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाला. त्या माध्यमातून ट्रस्टमधील ६९ कोटी रुपयांची मालमत्ता कंपनीत हस्तांतरित करण्यात आली.
खासदार भावना गवळी यांना ईडीचे पुन्हा समन्स
ईडीच्या माहितीनुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ही ट्रस्ट त्यांनी कंपनी कायदा कलम ८च्या अंतर्गत कंपनीत रूपांतरित केले होते.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-04-2022 at 00:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed summons shiv sena mp bhavana gawali in money laundering case zws