लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मुंबई, दिल्ली आणि गुरगावमधील १९ ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती गुरुवारी दिली. सुमाया-डेंट्सू प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली असून त्यात ४६ लाख भारतीय चलन, चार लाख विदेशी चलन व तीन कोटी ४० लाख रुपयांचे सोन्याचे लगड जप्त करण्यात आले. मालमत्तांची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे हेही जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

A truck carrying 35 tonnes of betel nuts from Assam to Mumbai went missing
गृह फसणुकीप्रकरणी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
Bombay High Court
‘…तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या’, मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला सुनावलं; कारण काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

वरळी पोलीस ठाण्यात मे. डेंट्सू कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मे. सुमाया इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याचे प्रवर्तक यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहेत. त्यांच्यावर १३७ कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप आहे.

आणखी वाचा-गृह फसणुकीप्रकरणी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा

मंगळवारी हे छापे टाकण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. शोधमोहिमेत कागदोपत्री पाच हजार कोटींचे व्यवहार दाखवण्यात आले. त्यातील १० टक्के व्यवहारच खरे आहेत. पत वाढवण्यासाठी हे व्यवहार दाखवण्यात आले. त्यामुळे समभागांच्या किमतीत वाढ झाली, असे ईडीकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुमाया कंपनीची उलाढाल २१० कोटीवरून दोन वर्षांतच ६७०० कोटी रुपयांवर पोहचली. त्यामुळे समभागाची किंमत १९ रुपयांवरून ७३६ वर पोहोचले होते. आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत हा प्रकार घडला होता, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

Story img Loader