लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : नागपाडा येथे बॅग बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकून आठ बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली. यापूर्वी माझगाव परिसरातील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून १३ मुलांची सुटका करण्यात आली होती.

6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

नागपाडा येथील मदनपुरा भागातील दोन कारखान्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बॅग कारखान्याचा व्यवस्थापक हसमतुल्लाह अब्दुल माजिद मन्सुरी (२०), अब्दुल रेहमान शेख (२५) यांना अटक केली आहे. मुले बॅग शिवण्याचे काम करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते येथे काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पथकाने सामाजिक संस्थेच्या मदतीने आठ मुलांची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून १० ते १२ तास काम करून घेण्यात येत होते.

आणखी वाचा-मुंबईतील वृक्षांभोवतीचे सिमेंट काँक्रिटीकरण वर्षभरात हटवणार

यापूर्वी माझगाव भागातून बॅगच्या कारखान्यातून १३ मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना बिहार येथून आणण्यात आले होते. यामध्ये एक सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. मुलांना क्रूरपणे वागणूक देत कामावर ठेवल्याप्रकरणी कारखाना मालक गौस मोहम्मद फराज मेहबूब अन्सारी (२६) याच्यावर पोलिसांनी कारवाई करण्यात आली. या मुलांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.