महाराष्ट्रातील नाटय़वेडय़ा तरुणाईला नवे अवकाश मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या नाट्यजागराला शनिवारी सकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, एकामागोमाग सादर होत असलेले एकांकिकांचे तगडे सादरीकरण यांच्यामुळे वातावरणाला मोठी रंगत चढली आहे. आतापर्यंत ‘बिइंग सेल्फिश’ (मुंबई), ‘हे राम’ (नाशिक) ‘कोंडवाडा’ (अहमदनगर) या एकांकिकांचे सादरीकरण झाले असून उर्वरीत एकांकिका कशा असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा परमोच्च बिंदू असेल रंगभूमीवरील एक चालतेबोलते विद्यापीठ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे स्पर्धक नाटय़वेडय़ा तरुणांसमोरील मार्गदर्शनपर भाषण.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा