मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आठ केंद्रांना अद्याप मुहूर्त नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये चकरा माराव्या लागू नयेत म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील एकूण आठ रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने हे प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्याचे राज्य सरकारने ऑक्टोबर २०१७ मध्ये जाहीर केले होते. या निर्णयाला सात महिने होत आले तरी अद्याप या केद्रांना मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे अपंग व्यक्तींना जे. जे. रुग्णालयामध्येच हेलपाटे घालावे लागत आहेत.

मुंबई महानगर प्रदेशामध्ये अपंगत्व प्रमाणपत्र देणारे जे. जे. रुग्णालय हे एकमेव केंद्र असल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अपंग व्यक्तींना जे. जे. रुग्णालयातच यावे लागते. यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईतील केईएम, शीव, नायर, कूपर आणि राजावाडी या पालिका रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्रे देण्याची सुविधा सुरू करण्याचे ऑक्टोबर २०१७ मध्ये शासन निर्णयाद्वारे जाहीर केले. यासोबतच नवी मुंबईतील वाशी येथील सर्वसामान्य रुग्णालय आणि ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज व ओरस येथील लोकमान्य रुग्णालयामध्येही केंद्रे सुरू होणार असल्याचेही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले. मात्र, या निर्णयाला आता सात महिने उलटत आले तरी यापैकी एकही केंद्र सुरू झालेले नाही. या केंद्राचे प्रशिक्षणही अनेक काळ रखडल्यानंतर अखेर १३ मार्च रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये पार पडले. त्यानंतरही या रुग्णालयांनी केंद्र उघडण्यासाठी तत्परता दाखविलेली नाही. त्यामुळे अपंग व्यक्तींना आजही जे. जे. रुग्णालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही.

एकीकडे रुग्णालये पुढाकार घेत नाहीत आणि दुसरीकडे संचालनालयही केंद्र सुरू करण्यासाठी तत्परता दाखवीत नाहीत. दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवीत असल्याने अपंग व्यक्तींना मात्र नाइलाजाने जे.जे. रुग्णालयाच्या गर्दीत ताटकळत राहावे लागते, असे जे.जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

शीवमध्ये सुविधा

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ शीव रुग्णालयाने हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य रुग्णालयांकडून अद्यापही कोणता प्रतिसाद मिळालेला नाही, असे आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शीव रुग्णालयातील पाच अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले असून यासाठी लागणारा संगणक आणि सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या लवकरच हे केंद्र रुग्णालयामध्ये सुरू होणार असल्याचे शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले.