मुंबई : कोणत्याही कागदपत्राशिवाय मोबाइल पोर्ट करून सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांना यश आले आहे. आरोपी मोबाइल कंपन्यांतील कर्मचारी व दुकानदार आहेत. ५१ लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा – वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

हेही वाचा – मुंबई विमानतळावर दीड महिन्यात २१ धमक्या

u

u

महादेव कदम, रोहित यादव, सागर ठाकूर, राज आर्डे, गुलाबचंद जैस्वार, उस्मान अली शेख, अब्बुबकर युसूफ व महेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. आरोपींनी सायबर फसवणुकीसाठी कोणतीही केवायसी कागदपत्रे न घेता केवळ यूपीसी कोडद्वारे मोबाइल क्रमांक पोर्ट केले. त्यानंतर त्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी करण्यात आला. शेअर बाजारातील गुंतवणूकीपासून इतर सायबर फसवणुकीसाठी या क्रमांकाचा वापर करण्यात आला. गेल्या एका वर्षात त्यांनी परदेशी नागरिक, तसेच इतर व्यक्तींना ३० हजार सीमकार्ट विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.