सुशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टाळेबंदीनंतर परप्रांतीय कामगार, मजुरांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोवण्यासाठी एसटी महामंडळाने मोफत बससेवा सुरू केली असून नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव हे नाशिक क्षेत्र आणि पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पुणे क्षेत्रातून सात दिवसांत ८५ हजारपेक्षा जास्त कामगारांनी एसटीने स्थलांतर केले आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ११ हजार ३७९ बसमधून १ लाख ४१ हजार ७९८ कामगारांना मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडून त्यांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे. यासाठी तब्बल २२ हजार चालक दिवसरात्र सेवा देत आहेत. ५०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासासाठी एका बसवर दोन चालक दिले जात आहेत. त्यामुळे एका चालकाला विश्रांती मिळू शकेल.

९ मेपासून गेल्या सात दिवसांत नाशिक क्षेत्रातून ४४ हजार ५३६ आणि पुणे क्षेत्रातून ४२ हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांना एसटीतून सोडण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मुंबई क्षेत्रातूनही कामगारांचे स्थलांतर मोठय़ा प्रमाणात होत असून २५ हजार कामगारांच्या स्थलांतरासाठी १ हजारपेक्षा जास्त एसटी बस वापरण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अत्यावश्यक सेवा दिली जात असल्याने कामगारांना सोडण्यासाठी बस अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे अहमदनगर, रत्नागिरी, नाशिक विभागातून ७०० एसटी बस मागवण्यात आल्या आहेत.

पायी जाणाऱ्यांनाही सुविधा

पायी जाणाऱ्या कामगारांना आरटीओ किंवा महामार्ग पोलिसांकडून जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून बसची सुविधा उपलब्ध केली जाते. शिवाय एसटी आगारातूनही सुटत असलेल्या बस सुविधांचा कामगार फायदा घेत आहेत.

* औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या औरंगाबाद क्षेत्रातून ८ हजार ६११ कामगार

* भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या नागपूर क्षेत्रातून १९ हजार २९४ कामगार

* अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या अमरावती क्षेत्रातून २ हजार ३३३ कामगार