मुंबई : पुणे भोसरी येथील जमीन खरेदीतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. खडसे यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले होते.
हेही वाचा >>> लोअर परेल पुलावर पदपथाची निर्मिती करा- पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आदेश
विशेष न्यायालयाने त्यांना अखेर नियमित जामीन मंजूर केला. त्यामुळे अटकेविना नियमित जामीन मिळणारे खडसे हे एकमेव माजी मंत्री आहेत. संबंधित जमिनीच्या व्यवहाराशी आपला संबंध नाही. आरोप हे राजकीय हेतूने केल्याचा दावाही खडसे यांच्यातर्फे जामिनाची मागणी करताना करण्यात आला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी खडसे यांची नियमित जामिनाची मागणी मान्य करून त्यांना दोन लाखांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि तेवढय़ाच हमीवर जामीन मंजूर केला.