ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज हयात असते, तर राजकारणात वेगळे चित्र दिसले असते, असे महसूलमंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसेंविरोधात आरोपसत्र सुरू असताना भाजपमध्ये एकाकी पडलेल्या खडसे यांना मुंडे यांची सध्या प्रकर्षांने आठवण होत आहे. मुंडे हे ओबीसी व बहुजन समाजाचे नेते होते. त्यांनी त्यांच्यासाठी मोठा संघर्ष केला आणि संघटनेचीही चांगली बांधणी केली. मुंडे हे अतिशय उमदे नेते होते, असे खडसे यांनी स्पष्ट केले. वादात अडकलेल्या खडसे यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी जाहीरपणे खडसे यांची फारशी पाठराखण केली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-05-2016 at 00:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse gopinath munde