महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी उतरल्या असून आज त्यांनी महिला प्रतिनिधी वर्गातून आपला अर्ज दाखल केला. या संघाच्या २१ जागांसाठी ३० मार्च रोजी निवडणूक होणार आहे. कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या संघावर कब्जा करण्यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी केली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी उत्तर महाराष्ट्र महिलागटातून अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे शैलजा प्रकाशबापू पाटील, ज्ञानेश्वर पवार, अजय धायगुडेपाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2016 रोजी प्रकाशित
महानंदच्या निवडणूक रिंगणात खडसे यांच्या पत्नी
या संघाच्या २१ जागांसाठी ३० मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 27-02-2016 at 01:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse in mahanada election