शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी नसल्याने आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे हे सर्वात ज्येष्ठ मंत्री असल्याने उपमुख्यमंत्र्याचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सुसज्ज कार्यालय कोणाला मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. खडसे हेच अजित पवार यांचे कार्यालय आणि देवगिरी बंगल्याचे दावेदार असल्याचे मानले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसे यांचा हक्क डावलण्याची शक्यता नाही. दालनांचे वाटप नसल्याने कार्यभार स्वीकारुन मंत्र्यांनी बसायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय हे मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाच्या तोडीस तोड असून नूतनीकरणानंतर त्याला ‘कॉर्पोरेट लुक’ देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे दालन, अँटीचेंबर, कर्मचाऱ्यांची बसण्याची जागा, अभ्यागत कक्ष हे सारे प्रशस्त व वातानुकूलित आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय एकनाथ खडसेंना मिळणार?
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी नसल्याने आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे हे सर्वात ज्येष्ठ मंत्री असल्याने उपमुख्यमंत्र्याचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सुसज्ज कार्यालय कोणाला मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे.

First published on: 03-11-2014 at 03:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse to get deputy cm office