मुंबई : आपल्याला पक्षादेश (व्हीप) मिळालाच नव्हता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील २२ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत गुरुवारी केला. यासह अन्य काही मुद्दय़ांवर कागदपत्रे, पुरावे आणि उत्तरादाखल शपथपत्रे सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात आली असून २१ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने सहकार्य केले, तरच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ३१ डिसेंबरच्या कालमर्यादेत याचिकांवर निर्णय देता येईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर नार्वेकर यांच्यापुढे गुरुवारी विधानभवनात सुनावणी झाली. त्यावेळी आपल्याला पक्षादेश मिळालाच नसल्याचा दावा शिंदे आणि त्यांच्या गटातील २२ आमदारांकडून करण्यात आला. काही आमदारांचे ई मेल चुकीचे आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पक्षादेश पाठविणारे विजय जोशी कोण, हे आम्हाला माहीत नाही, असे मुद्दे शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आले. मग या आमदारांचे खरे ईमेल कोणते, ही माहिती त्यांनी सादर करावी, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी ठाकरे गटातर्फे केला. सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिका आणि त्यासोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे यातील मुद्दे अपात्रता याचिकांवरील सुनावणीत पुरावे म्हणून गृहीत धरली जाणार आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे, त्यातील मुद्दय़ांविषयी आक्षेप व उत्तरे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

हेही वाचा >>>राज्यातही ओबीसी जनगणना करा; भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मागणी

पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार असून त्यावेळी साक्षीदार तपासणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आपण हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे सुनावणी घेणार असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ३१ डिसेंबरच्या कालमर्यादेत निर्णय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नार्वेकर यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना सांगितले व त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे व इतरांनी काम पाहिले.

आमदार अपात्रतेबाबत २१ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी

पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार असून त्यावेळी साक्षीदार तपासणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आपण हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे सुनावणी घेणार असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ३१ डिसेंबरच्या कालमर्यादेत निर्णय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नार्वेकर यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना सांगितले व त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे व इतरांनी काम पाहिले.

Story img Loader