मुंबई : स्वा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणारा ठराव शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आला असून उद्धव ठाकरे गटाच्या मागणीला  शह देण्यात आला आहे. तर शिवसेनेची शिस्तभंग समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षादेश बजावून ठाकरे गटाची कोंडी करण्याची रणनीती शिंदे गटाने ठरविली आहे. चर्चगेट रेल्वेस्थानकाला माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे नाव देण्याची मागणी करणारा ठरावही बैठकीत करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेना हे पक्षनाव शिंदे गटाला मिळाल्यावर जुनी मागणी सोडलेली नाही, हे दाखविण्यासाठी शिंदे गटाने हा ठराव केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पक्षाची वाटचाल होईल आणि मी पक्षप्रमुख हे पद घेणार नाही,मुख्य नेता हे पद राहील, असे शिंदे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रात भाजपचे सरकार असताना स्वा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करून ठाकरे गटावर  कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विधिमंडळ गटनेतेपदी शिंदे असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांना आता त्यांचा व्हीप पाळावा लागेल, असा इशारा शिंदे गटातील नेत्यांनी दिला आहे. त्यादृष्टीने ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीप बजावला जाण्याची रणनीती आहे. पक्षशिस्तीचा भंग किंवा आदेशाचे पालन न केल्यास कारवाईसाठी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून मंत्री शंभूराज देसाई यांचाही त्यात समावेश आहे. पक्षातील निर्णयाचे सर्वाधिकार शिंदेंकडे असतील असे उदय सामंत यांनी जाहीर केले.

शिंदे मुख्य नेतेपदी

मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड सत्ता स्थापनेच्या वेळी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय दिल्यावर शिंदे गटाने ठाकरे गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मंगळवारी तातडीची बैठक घेण्यात आली व त्यात महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. याविषयी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली.