मुंबई : विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. कोण निवडून येणार याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. निकालानंतर ‘वर्षां’ बंगल्यावर महाविकास आघाडीचे नेते जमले होते. तेवढय़ात एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेला गेल्याचे वृत्त धडकले. शिंदे यांनी बंड करून सुरत गाठली आणि पुढील दहा दिवसांत राज्याचे सारे राजकारणच बदलले. शिंदे यांच्या या बंडाला उद्या एक वर्ष पूर्ण होतआहे.

विधान परिषद निवडणुकीपूर्वी दहा दिवसआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाल्याने महाविकास आघाडीत धागधुग होती. भाजपने एक जास्त उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत आधीच भीती होती. कोणाचा उमेदवार पडणार याचे अंदाज बांधले जात होते. मतमोजणी सुरू झाली. भाजपच्या उमा खापरे यांचे एक मत बाद ठरविल्याने आघाडीचे नेते काहीसे नििश्चत होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधान भवनातील त्यांच्या दालनात पत्रकारांशी गप्पा मारत बसले होते. रात्री आठनंतर चित्र जरा बदलू लागले. फडणवीस काही कामानिमित्त अ‍ॅन्टी चेंबरमध्ये जाऊन बसले. अगदी भाजपच्या आमदारांनाही त्यांची भेट मिळत नव्हती.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!

राष्ट्रवादीचे नेते दोन्ही जागा निवडून आल्याने आनंद व्यक्त करीत होते. एक जागा पडणार याचा अंदाज आल्याने काँग्रेसचे नेते सुतकी चेहरा टाकून बसले होते. रात्री अकराच्या सुमारास निकाल जाहीर झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे नेते ‘वर्षां’वर दाखल झाले. तेवढय़ात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार सुरतच्या दिशेने गेल्याची चर्चा सुरू झाली. गृह विभागाने पालघर पोलिसांशी संपर्क केला असता काही गाडय़ा पालघर हद्दीतून गुजरातमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते.

आमदार रात्रीच सुरतमध्ये पोहचले. २० ते ३० जून या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. सुरतहून आमदारांचा मुक्काम गुवाहटीमध्ये हलला. तेथे शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत गेली. शेवटी ३० जूनला भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.