मुंबई : शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार घेऊन बाहेर पडल्यापासून आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना टोलावून लावलेल्या एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत आपल्या शिवसेनेची बांधणी घट्ट केली. याच आत्मविश्वासाने निवडणुकीतही यश मिळवले. मात्र, या यशाचा परिपाक असलेल्या शपथविधी सोहळ्याच्या झगमगाटात शिंदेंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास मात्र फिका पडला होता. देहबोलीतील हा थकवा आजारपणामुळे की राजकीय अस्वस्थतेमुळे, हीच चर्चा सुरू होती. हा ‘थकवा’ दूर करून शिंदे संघटना कशी सावरतात, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Praniti Shinde Criticized Devendra Fadnavis
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या…”
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजपला मोठया पराभवाचा सामना करावा लागला. तुलनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी उजवी राहीली. तरीही स्वत: शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या पक्षाची स्वतंत्रपणे आखणी करण्यास सुरुवात केली. राज्याच्या वेगवेगळ्या भागात दौरे वाढविले, आमदारांना ताकद दिली, उमेदवारांची निवड केली आणि जेथे आवश्यकता तेथे भाजपची मदत घेत स्वत:च्या जागा कमी होणार नाहीत याची काळजी घेतली. त्यामुळे महायुतीचा चेहरा शिंदेच असा प्रचार त्यांच्या पक्षाकडून सातत्याने केला गेला. पण निवडणुकीच्या निकालानंतर चित्र बदलले. मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता दुरावत चालल्याचे दिसल्यानंतर शिंदेंच्या गोटात नाराजी पसरत गेली. त्यातच शिंदेंच्या आजारपणाला ‘अस्वस्थतेची’ किनार लाभली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे जाहीर झाल्यानंतरही शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही, याबाबतही अनिश्चितता प्रत्यक्ष शपथविधी सोहळ्यापर्यंत रंगली. सोहळ्यातही शिंदे यांची अस्वस्थ देहबोली चर्चेचे कारण बनली.

हेही वाचा >>> Uday Samant : “दैनिक ‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट, वृत्तपत्राचा अवमान करण्याचा हेतू नव्हता”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?

शपथविधी सोहळ्यात फडणवीस-पवार यांचे जॅकेट, पेहराव एकसारखा एकाच रंगाचा होता. हा उत्सवी थाटमाट शिंदे यांच्या पेहरावात दिसला नाहीच शिवाय फडणवीस, पवार यांच्यापासून त्यांचे विलग बसणेही खुपणारे ठरले. शपथ घेण्यासाठी व्यासपीठावरून जात असतानाही त्यांच्या हालचालींमध्ये यांत्रिकपणा जाणवला. शपथ घेताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे या शिवसैनिकांसाठी दैवत असलेल्या दोन नेत्यांची नावे घेतानाच नरेंद मोदी, अमित शहा यांचा केलेला उल्लेख मात्र महाशक्तीचा पाठिंबा त्यांच्या पक्षाच्या वाटचालीसाठी आगामी काळातही किती आवश्यक असेल याचीच चर्चा अधिक रंगली.

Story img Loader