मुंबई : दक्षिण मुंबईतील अपक्ष उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावल्याच्या आरोपाखाली शिवसेना (शिंदे गट) विभागप्रमुख दीपक पवार व पक्ष सचिव वैभव थोरात यांच्याविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकावणे, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भांदवि कलम १७१ ई, १८८ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०, १९५१, १९८९ कलम १२३ (१) (अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार प्रशांत घाडगे हे भाजीपाला विक्रेता असून त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. तक्रारीनुसार, ६ मे रोजी त्यांना वर्गमित्र दीपक पवार यांचा मोबाइलवर दूरध्वनी आला आणि चर्चेदरम्यान त्याने निवडणुकीसंदर्भात बोलायचे असल्याचे सांगितले. त्यावर तक्रारदार प्रशांत घाडगे यांनी काय बोलायचे आहे असे विचारले असता त्याने प्रत्यक्ष भेटून सांगतो असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शुभेच्छा देण्याचे हेतूने दीपकला भेटायचे असेल असे तक्रारदार प्रशांत घाडगे यांना वाटले. म्हणून प्रशांत हे दीपक यांना मेकर टॉवर लगत असलेल्या एका गार्डन बाहेरील वाहनतळाजवळ भेटले.

pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Badlapur sexual assault case, akshay shinde parents,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Fraud case filed against three brokers including Gujarati man for submitting forged visa documents
अमेरिकन वकिलातीत बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
Former Director General of Police Sanjay Pandey demands cancellation of extortion case in High Court Mumbai news
खंडणीचा गुन्हा रद्द करा; माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात मागणी
police crime marathi news
“पोलिसांनी गुन्हा केला तर अधिक कठोर…”, वाचा, जामीन रद्द करताना काय म्हणाले न्यायालय?
Case registered against four guilty officials in LPG gas leak at Jindal Company in Jaigad
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या एलपीजी वायू गळतीतील चार दोषी अधिका-यांवर गुन्हा दाखल; कंपनी लवकरच चौकशी अहवाल सादर करणार

हेही वाचा…मुंबई : शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेची जय्यत तयारी, सव्वालाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित

तक्रारदार प्रशांत घाडगे दुपारी १२.४५ वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. दीपक तेथे अगोदरच कोणासोबत तरी मोबाइलवर बोलत हजर होता. त्यावेळी तक्रारदार प्रशांत यांना मनात शंकेची पाल चुकचुकली. भीती वाटल्याने स्वसंरक्षणाच्या हेतूने मोबाइलमधील रेकॉर्डिंग सुरू केले.

दीपकचे मोबाइलवरील बोलणे संपल्यानंतर प्रशांत यांच्याशी बोलण्यास सुरूवात केली. यावेळी दोन लाख रुपये घे आणि निवडणूक अर्ज मागे घे, असे त्याने सांगितले. त्यावर तक्रारदार वैतागले. त्यावेळी दीपकने साहेबांबरोबर बोल असे सांगून दूरध्वनी केला. समोरील व्यक्तीने शिवसेना पक्ष सचिव बोलत असल्याचे सांगितले. त्यावर तक्रारदारांना त्याने शिवसेना पक्ष सचिव वैभव थोरात बोलत असल्याचे सांगितले. थोरात यांनी तक्रारदारांना दोन ते पाच लाख रुपये घेऊन उमेदवारी मागे घेण्याबाबत सांगितले. तुझ्या उमेदवारीने जातीय समीकरण बिघडेल, अशा आशयाचे यावेळी बोलणे झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा…मुंबई : अंधेरीत २२ मे रोजी १६ तास पाणीपुरवठा बंद, आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठाही खंडित होणार

त्यानंतर थोरात याने तक्रारदार प्रशांत यांना यापेक्षा जास्त अपेक्षा असेल तर रात्री दहा वाजता कार्यालयात यामिनी जाधव यांची भेट करून देतो असे सांगितले. ही सर्व चर्चा जवळपास अर्धा ते पाऊण तास चालली. मात्र ही सर्व चर्चा प्रशांत घाडगे यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. आपल्या समर्थकांमध्ये गैरसमज पसरू नये याकरता ७ मे रोजी व्हाट्सअप द्वारे प्रशांत घाडगे यांनी आपल्या मित्रांना पाठवली. त्यानंतर ८ मे रोजी दीपक पवार याने प्रशांत घाडगे यांना दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. मात्र दूरध्वनी न उचलल्याने काही वेळाने दीपक पवार तक्रारदारांच्या घराबाहेर हजर झाला आणि तक्रारदारांना बाहेर बोलावून वायरल केलेली ध्वनीफीत डिलीट करण्यास धमकावले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्याप्रकरणी रेकॉर्डिंग पेन ड्राईव्हमध्ये जतन करून पोलिसांना देऊन प्रशांत घाडगे यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात आरोपी वैभव थोरात आणि दीपक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader