मुंबई : रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयावरून राजकारण तापले असून, शिवसेना व राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण सुरू केले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय असाच प्रलंबित ठेवला जाण्याची चिन्हे आहेत.

रायगडमध्ये आदिती तटकरे व नाशिकमध्ये गिरीश महाजन या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. यावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रायगडचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत भरत गोगावले हे आडून बसले आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे व शिवसेनेचे दादा भुसे यांनी दावा केला आहे.

Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
advertisement boards indicators Dombivli railway station local train passengers
डोंबिवली रेल्वे स्थानकात जाहिरात फलकांमुळे इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना नेत्यांची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.

हेही वाचा :लोढा कुटुंबात वादाचे तडे, व्यापारचिन्हाच्या मालकीवरून भावांमध्ये न्यायालयीन संघर्ष

रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा विषय हाताळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

हसन मुश्रीफही नाराज

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दहापैकी आठ मंत्र्यांना बाहेरच्या जिल्ह्याची पालकमंत्रीपदे मिळाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता आहे. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

परदेशातून स्थगितीचा निर्णय

सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदावरून वाद होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावरून वाद आणि आता पालकमंत्रीपदासाठी वाद सुरू आहेत. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले पण त्यांना तेथून नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली.

टीका खपवून घेणार नाही, अजित पवार गटाचा शिंदे यांना इशारा

● आमच्या नेत्यांवर असभ्य शब्दांमधील टीका खपवून घेणार नाही, शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मंगळवारी शिवसेनेला (शिंदे) दिला. महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीप्रकरणी असंतोष खदखदत असून सरकारमधील दोन घटक पक्षांमधील वाद यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा :५ लाख कोटींचे करार, दावोस परिषदेत राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्हे

● रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्यास गेल्याने रायगड जिल्ह्यात टायर जाळून शिवसेनेच्यावतीने असंतोष व्यक्त केला जात आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी आपले म्हणणे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडावे. मंत्री भरत गोगावले हे संविधानिक पदावर आहेत, त्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यात भाग घेणे निषेधार्ह असल्याचे परांजपे म्हणाले.

● रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना दिले होते. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.

असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे : खा. सुळे

पुणे : सहपालकमंत्री या असंविधानिक पदाची निर्मिती राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. असंविधानिक पदनिर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वांत पुढे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मासिक आढावा बैठक मंगळवारी निसर्ग मंगल कार्यालय येथे झाली. बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुळे म्हणाल्या, ‘राज्य सरकारने सहपालकमंत्री हे असंविधानिक पद निर्माण केले आहे. अशा पदांची निर्मिती करण्यात राज्य हे देशात सर्वांत पुढे आहे. राज्यापुढे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे लक्ष नाही.

रायगडसाठी शिंदेंवर दबाव

मुंबई: रोजगार मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात यावे या मागणीसाठी रायगडमधील शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय बंगला ‘मुक्तागिरी’वर धडक दिली. शिंदे यांनीही गेली अनेक वर्ष जिल्ह्यात काम केल्यानंतर पालकमंत्रीची अपेक्षा ठेवणे गैर नाही, असे मत व्यक्त करुन गोगावले यांची पाठराखण केली.

हेही वाचा :मालेगाव प्रकरणी सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली व्यवहार, अमेरिका, सिंगापूर, यूएईमधील कंपन्यांना कोट्यवधीची रक्कम पाठवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. या यादीत रायगडच्या पालकमंत्रीपदी बाल व महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांचे नाव जाहीर केल्यानंतर रायगडमधील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. काही ठिकाणी आंदोलन करण्यात आली.

नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही वाद तयार झाला. या ठिकाणी शिवसेनेच्या दादा भुसे यांच्या ऐवजी भाजपच्या गिरीश महाजन यांचे नाव जाहीर करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली गेली.

Story img Loader