शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवरील ईडीची कारवाई आणि भाजपाकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे-फडणवीसवर हल्ला चढवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा देवेंद्र फडणवीसांकडे असल्याचं सांगत ठाकरेंना इशारा दिला. ते शनिवारी (२४ जून) मुंबईत मराठा मंदिर अमृत महोत्सवानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांवर आरोप केले जात आहेत, पातळीसोडून बोललं जात आहे. हे सर्वजण पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी माझा नातू रुद्रांशलाही राजकारणात ओढलं गेलं. त्या लहान मुलाला राजकारण काय कळतं.”

“फडणवीसांनी अनेकदा या माजी मुख्यमंत्र्यांना मदत केली”

“मी त्यांची लायकी म्हणणार नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा या माजी मुख्यमंत्र्यांना मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना मदत केली आहे. त्यांनी याची किमान जाणीव तरी ठेवली पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांबरोबर मी काम केलं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. हे कसला आरोप करत आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : VIDEO: “मी तुमच्या कुटुंबावर बोललो, तर केवळ पडून रहावं लागेल, योगा…”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

“फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिट्ठा”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिट्ठा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि किंबहुना आत्ताही त्यांनी उद्धव ठाकरेंना मदत केली. हा केवळ कृतघ्नपणा आहे.”

हेही वाचा : VIDEO: “मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या शेजारी बसलो, कारण…”, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

“कर नाही तर, डर कशाला?”

“मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. मी त्या गोष्टी इथं बोलू इच्छित नाही. मात्र, ‘समझनेवाले को इशारा काफी हैं’. मुंबईत चौकशी सुरू आहे त्यावरूनच हे सर्व सुरू आहे. ही चौकशी सरकार करत नाहीये. ही चौकशी ईडी करत आहे. हे का घाबरत आहेत? कर नाही तर, डर कशाला? त्यांनी चौकशीला सामोरं जावं,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde warn uddhav thackeray mention devendra fadnavis rno news pbs
Show comments