डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ अपंगाच्या डब्यातून एका ज्येष्ठ नागरिकाला लोकलमधून ढकलून देणाऱ्या महमद अन्सारी (२०) या तरुणाला रेल्वे पोलिसांनी शनिवारी कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्सारी कसारा लोकलने सीएसटीकडे चालला होता. तो अपंगांच्या डब्यात बसला. नंदकुमार जोशी या ज्येष्ठ नागरिकाने त्याला ‘तू अपंगाच्या डब्यात का चढला’ म्हणून जाब विचारला. यावरून दोघांच्यात वाद सुरू झाल्यानंतर अन्सारीनेजोशी यांना खाली ढकलून दिले.  

Story img Loader