मुंबई :  गोरेगाव येथील ६८ वर्षीय महिलेला डिजिटल अटक करून त्याच्या बँक खात्यातून सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हैदराबादमध्ये घडलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असल्याची भीती घालून सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी या महिलेची फसवणूक केली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत. तक्रारदार महिला बँकेत कामाला होत्या. त्यांनी २०१४ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्या गोरेगाव पश्चिम येथे पतीसोबत राहतात. नोव्हेंबर महिन्यात त्यांना एका महिलेचा दूरध्वनी आला होता. आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सेवा क्रमांकावरून बोलत असल्याचे तिने सांगितले. क्रेडिट कार्डवरील रक्कम न भरल्यामुळे बँकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात येत असल्याचे या महिलेने तक्रारदारांना सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला घाबरली, तिने आपण असे कोणतेही क्रेडिटकार्ड वापरत नसल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेने करोनाबाधितांसाठी घेतलेले ईएसआयसीचे रुग्ण कक्ष तब्बल तीन वर्षांनी केले परत

Eknath Shinde On Ladki Bahin Yojna
Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’, मुख्यमंत्र्यांचे १० मोठी आश्वासनं
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”
Vulgar Dance in Mangesh Kudalkar Election Campaign
Vulgar Dance In Election Campaign : मंगेश कुडाळकरांच्या प्रचारात अश्लील नाच, व्हायरल व्हिडीओवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला ‘हा’ आरोप
lucky rashi
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी
Rashi Bhavishya On 31st October 2024
३१ ऑक्टोबर पंचांग: दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार? व्यावसायिक क्षेत्रात प्रगती ते अचानक धनलाभ होणार; वाचा १२ राशींचे भविष्य
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा

मला काहीही सांगू नका, तुम्ही हैदराबाद पोलिसांशी बोला, असे सांगून त्या महिलेने त्यांचा दूरध्वनी दुसऱ्या क्रमांकावर वळवला. त्या क्रमांकावर हैदराबाद पोलीस दलातील कथित अधिकारी आकाश गुलाटी बोलत होता. क्रेडिट कार्ड गैरव्यवहारासह ५०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारातही तुमचा सहभाग असून त्यातील २० लाख रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे त्याने सांगितले. त्या क्रमांकाशी तुमचे आधार कार्ड लिंक असल्याचेही या तोतया पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर आरोपींनी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाशी (सीबीआय) संबंधित असल्याचे सांगून महिलेला डिजिटल अटक केली. या काळात ते राहत असलेल्या खोलीत कोणीच येणार नाही, तसे पतीलाही याबाबत समजणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. त्यावेळी गुलाटीचा वरिष्ठ अधिकारी म्हणून एका व्यक्तीने तक्रारदार महिलेशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्याने आपण आकाश कुल्हारी असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> लुटीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी अटकेत

तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेचा दहशवादी कृत्यामध्ये वापर झाल्याचे सांगून तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवली. त्यामुळे महिला घाबरली, तिने आपला याप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून त्यांना पुरावे लागतात, असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर कुल्हारीने व्हिडिओ कॉल तसाच सुरू ठेवला. त्यांना सीबीआय, सर्वोच्च न्यायालय व तेलंगणा सरकारचा लोगो असलेली पत्र पाठवण्यात आली. त्यानंतर महिलेने भविष्य निर्वाह निधी, बचत खाते, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी असे एकूण एक कोटी १८ लाख २० हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर जमा केले. संपूर्ण महिनाभर त्यांनी कोणालाच हा प्रकार सांगितला नाही. तक्रारदार महिलेने वृत्तपत्रामध्ये डिजिटल अटकेबाबतची बातमी वाचली व त्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी १९३० या सायबर हेल्पलाईनला दूरध्वनी करून तक्रार केली. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला असून तक्रारदार महिलेने रक्कम जमा केलेल्या बँक खात्याच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

Story img Loader