लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : नेपियन्सी रोड या उच्चभ्रू परिसरातील तहनी हाईटस या इमारतीत राहणाऱ्या सराफाच्या ६३ वर्षीय पत्नीच्या हत्येतील आरोपी भुसावळ येथे सापडला. घरगडी म्हणून पहिल्याच दिवशी कामावर रुजू झालेल्या कैन्हयाकुमार पंडीत (२०) या नोकराने हत्याकडून पलायन केले होते. अखेर मलबार हिल पोलिसांना तो भुसावळ येथे सापडला.
ज्योती शहा असे मृत महिलेचे नाव होते. तनीया हाईटसमधील २० व्या मजल्यावरील सदनिकेत मुकेश शहा व कुटूंब राहते. मुकेश यांचे ट्रायटंड हॉटेलात सोने चांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता कैन्हयाकुमार हा घर गडी म्हणून शहा यांच्या घरी कामावर रुजू झाला होता. आठ वाजता दुसरा नोकर त्याचे नियमित काम करून निघून गेला. त्यानंतर दीड वाजता मुकेश हे त्यांच्या ४२ वर्षीय मुलीसोबत त्यांच्या दुकानावर निघून गेले. मग तो अणि ज्योती शहा असे दोघेच घरात होते.
आणखी वाचा-मुंबई : सायबर फसवणूक करणाऱ्यांना सुमारे ५०० सिम कार्डची विक्री, आरोपीला अटक
दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मुलीने ज्योती यांना मोबाईल तसेच घरातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण दूरध्वनी उचलला गेला नाही. त्यामुळे शेजारच्यांना मुलीने संपर्क साधून आईला बघण्यास सांगितले असता दरवाजा बंद आढळून आला. त्यामुळे मुकेश व त्यांच्या मुलीने घरी येऊन पाहिले असता ज्योती बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवाय कैन्हयाकुमार देखील बेपत्ता झाला होता. जाताना त्याने मोबाईल बंद ठेवला होता.
आणखी वाचा-आता वर्सोवा-विरार नव्हे, उत्तन, भाईंदर-विरार सागरी सेतू
ज्योती शहा यांची हत्या केल्यानंतर आरोपी पंडीतने मुंबई सोडली आणि दुसऱ्याच्या मोबाईलवरून वडिलांना दूरध्वनी केला. ८ मार्चला बिहारहून मुंबईत आलेल्या त्या नोकराला त्याच्याच ओळखीच्या व शहा यांच्या कडे काम करणाऱ्या तरुणाने कामावर ठेवले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी सात वाजता कामावर आलेला तो नोकर दुपारी तीन वाजता ज्योती गळा आवळून हत्या केली होती. ज्योती यांच्या हातातील दोन हिरेजडीत बांगड्या गायब होत्या. त्यांची किंमत तीन लाख रुपये आहे. घराबाहेरील सीसीटीव्हीवरून आरोपीच शेवटचा घरातून बाहेर पडल्याचे निष्पन्न झाले होते.