महापालिका निवडणुकीसाठी आयोगाची सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या संपत्तीची माहिती मतदारांना बोबाईलवर मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी ‘ट्र अ‍ॅप’ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याचा मार्ग किंवा रस्ता, याची सर्व माहिती मिळणार आहे. उमेदवारांनाही त्यांच्या रोजच्या खर्चाचा तपशील या अ‍ॅपद्वारे निवडणूक आयोगाला सादर करता येणार आहे.

मतदनाच्या दिवशी मतदार यादीतील नाव शोधणे हा मतदारांसाठी अनेकदा त्रासदायक प्रकार असतो. मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात, तर पत्ता भलत्याच गृहनिर्माण संस्थेचा दिलेला असतो. ज्यांच्याकडे संगणक किंवा लॅपटॉपची व्यवस्था नाही, त्यांना त्यांचे नाव, मतदान केंद्र शोधण्यासाठी राजकीय पक्षांनी थाटलेल्या टेबलावर जाऊन शोधावे लागते. मतदानाच्या दिवशीच अनेक मतदारांना अशा प्रकारचा होणारा त्रास कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने आता मोबाईलवर माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांची संपत्ती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरतानाच, त्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांची संपत्तीची तपशीलवार माहिती आयोगाला सादर करावी लागते. परंतु ती माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बघून ती माहिती मिळविण्याचाही कुणी त्रास घेत नाही. आता सर्व जनतेला खास करुन मतदारांना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या संपत्तीची माहीतीही ‘ट्र अ‍ॅप’च्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार आहे. उमेदवारांनाही आपला रोजचा खर्च अ‍ॅपद्वारे सादर करता येणार आहे. त्यामुळे दर दिवशी संबंधित निवडणूक कार्यालयात जाऊन खर्चाची कागतपत्रे सादर करण्याचा त्रास व वेळ त्यांचा वाचणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांत काही प्रमाणात या अ‍ॅपचा प्रयोग केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता राज्यात होऊ घातलेल्या मुंबई व अन्य महानगरपालिकांच्या निडणुकीत या सुविधेचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे, असे आयोगातील सूत्राकडून सांगण्यात आले.