मुंबई : आतापर्यंत १ जानेवारी किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदारयादीत नोंदणी करता येत होती. मात्र, आता २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना आधीच मतदार म्हणून नोंदणी करण्याचीही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

हेही वाचा >>> मुंबई : ॲक्सिस बँकेची फसवणूक करणाऱ्या सराफाला अटक

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
How is census of population conducted
जनगणना कशी होते? प्रगणकांना कोणते अनुभव येतात?
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ

भारत निवडणूक आयोगाने  मतदारयाद्या सुधारित करण्यासाठीचा ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३’ हाती घेतला आहे. त्याअंतर्गत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. निधी चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात  करण्यात आली होती. या प्रभात फेरीच्या समारोपप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होत्या.

१ जानेवारी २०२३  रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून  १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेले युवक नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करू शकणार आहेत. यामुळे युवकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदानाचा अधिकार प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त होईल, असे चौधरी म्हणाल्या.

हेही वाचा >>> मुंबईः निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला

पूर्वी वर्षातून एकदा अथवा निवडणुकीपूर्वी काही कालावधी आधी मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करता येत होती. मात्र, आता वर्षातून चार वेळा मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छायाचित्रासह प्रारूप मतदारयादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली असून सर्व मतदारांनी या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा आवर्जून करून घ्यावी. ही यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकानार्थ उपलब्ध असणार आहे.

यासंदर्भात दावे व हरकती ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. तसेच ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १२ व १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.