Voter mobile number : विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नव मतदारांना आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. तसेच आधीच मतदार असलेल्यांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील जोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. मतदार यादीतील नावाबाबतची माहिती अद्ययावत करण्याबरोबरच यंदा मोबाइल क्रमांक जोडण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. मतदार यादीतील नावासोबत मोबाइल क्रमांक जोडल्याने निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या विविध सूचना आणि माहिती नागरिकांना आपल्या मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे.

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
SEBI
सेबीकडून चार Stock Brokers ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द, जाणून घ्या तुमच्याही ब्रोकरचा आहे का समावेश?
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
smart projects, World Bank, World Bank news,
‘स्मार्ट प्रकल्पां’च्या ढिसाळपणावर जागतिक बँकेचे ताशेरे

हेही वाचा – मुंबई : पवईतून मगरीची सुटका

हेही वाचा – वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास : ५५० घरांचा ताबा मार्च २०२५ मध्ये

आपला मोबाइल क्रमांक अद्ययावत केल्यास निवडणूक आयोगाच्या electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे, तसेच Voter Helpline मोबाइल ॲपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो. ई – मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येते. पूर्वी मतदार नोंदणी व इतर सेवा ऑफलाईन स्वरुपाच्या होत्या. त्यामुळे बहुतांश मतदार ओळखपत्रधारकाचे मोबाइल क्रमांक जोडलेले नाहीत. त्यामुळे मोबाइल क्रमांक जोडण्याची आवश्यकता आहे. एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी करावा, असेही आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Story img Loader