मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मतदान होत असून यासाठी निवडणूक आयोगाकडून पालिका प्रशासनाला विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र आसपासच्या परिसरात नालेसफाई, वृक्षछाटणी आदी कामे करून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महानगरपालिकेच्या ज्या शाळांमध्ये मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ती शाळा आणि आसपासच्या परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करण्याबाबत पालिकेला सांगण्यात आले आहे. तसेच, संबंधित परिसराच्या २०० मीटर अंतरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या आसपासच्या परिसरात कुठलेही धोकादायक बांधकाम असल्यास, त्याठिकाणी स्पष्ट सूचनाफलक लावून मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन करावे.

हेही वाचा…मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील दोषी जाहिरात कंपनीचे आणखी आठ फलक दादरमध्ये, पालिका प्रशासनाची पश्चिम रेल्वेला नोटीस

याचसोबत, मलनिस्सारण वाहिन्या पाहणी करून योग्य खबरदारी घेण्याबाबत पालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाने पालिकेला सतर्क केले आहे.