मुंबई : शाळांच्या सुट्टीमुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील चार जागांसाठी आता २६ जूनला निवडणूक होणार आहे. या जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार आहे.

विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १५ जूनला मतदान होणार होते. पण शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. यानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. ३१ मे ते ७ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस

हेही वाचा >>>मुंबई : बेस्टची ॲप आधारित विमानतळ प्रीमियम सेवा बंद

मुंबई पदवीधर मतदारसंघात गेली अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्या वतीने यंदा अनिल परब यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे हा मतदारसंघ गेल्यास माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे इच्छुक आहेत. मुंबई शिक्षकचे विद्यामान आमदार कपिल पाटील हे पुन्हा निवडणूक लढविणार नाहीत. लोकभारतीने सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबई, कोकण, नाशिकमधील आचारसंहिता लांबली

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ६ जून रोजी संपुष्टात येईल. पण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक जाहीर झाल्याने मुंबई, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक शिक्षकच्या अखत्यारीतील नाशिक, नगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधील आचारसंहिता ५ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. मुंबई, कोकण आणि नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आणखी महिनाभर आचारसंहितेमुळे सरकारी यंत्रणांवर बंधने येणार आहेत.

निवृत्त होणारे सदस्य : मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना ठाकरे गट), मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती), कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप), नाशिक शिक्षक : किशोर दराडे (अपक्ष)