मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी अचानक मतमोजणीच्या आदल्या दिवशी आजारी पडले. त्यामुळे ते मंगळवारी मजमोजणी केंद्रावर अनुपस्थित होते. मात्र यामुळे एक वेगळाच पेच निर्माण झाला होता. पहिल्या फेरीपासूनच्या मतमोजणीची आकडेवारी जाहीर करता येत नव्हती. त्यामुळे गोरेगाव येथे नेस्को मैदानाच्या बाहेर उभे असलेले कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांना दुपारपर्यंत काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Lok Sabha Election Results 2024 : ७० हजारांहून अधिक मुंबईकरांची ‘नोटा’ला पसंती

गोरेगावच्या नेस्को मैदानात उत्तर मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तीन मतदारसंघांतील मतमोजणी सुरू होती. यापैकी वायव्य आणि उत्तर मध्य या दोन मतदारसंघातील मतमोजणीची प्रत्येक फेरीची आकडेवारी ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात येत होती. मात्र बराच वेळ उत्तर मुंबई मतदारसंघातील आकडेवारी जाहीर करण्यात येत नव्हती. निवडणूक आयोगाच्या ॲपवर येणाऱ्या आकडेवारीवरूनच या मतदारसंघातील मतमोजणीची आकडेवारी मिळत होती. या मतदारसंघातील निवडणूक अधिकारी अचानक आजारी पडल्यामुळे आकडेवारी जाहीर करण्यास विलंब होत होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊ शकत नसल्यामुळे ही आकडेवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात येत नव्हती. त्यावर विचारविनिमय केल्यानंतर दुपारनंतर ही आकडेवारी जारी करण्यास सुरुवात झाली. मात्र त्यातही प्रत्येक फेरीनंतरची आकडेवारी विनास्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांवर येत होती. त्यामुळे महायुतीचे भाजपचे एकमेव उमेदवार भरघोस मतांनी आघाडीवर असतानाही त्यांच्या मतांची आकडेवारी अधिकृतपणे जाहीर होत नव्हती.