मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका गेले तीन वर्षे रखडल्या असल्या तरी २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी उद्या राज्यात मतदान होत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी राजकीय नेत्यांना आपापल्या प्रभाव क्षेत्रातील ताकदीचा या निमित्ताने अंदाज येऊ शकेल. 

राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. त्याची नक्की आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूक उद्याच होणार आहे. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे २५ हजार जागांसाठी रविवारी मतदान होईल. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

हेही वाचा >>>मध्य रेल्वेवरील १२ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

न्यायालयीन स्थगितीमुळे राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना करोना काळापासून मुहूर्त सापडलेला नाही. मुंबईसह राज्यातील २५ महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. २०० पेक्षा अधिक नगरपालिका व बहुतांशी जिल्हा परिषदांची मुदत संपल्याने तेथेही प्रशासकीय राजवट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे एप्रिलपूर्वी या निवडणुका होणार की नंतर होणार याबाबत राजकीय नेतेही संभ्रमात आहेत. ग्रामपंचायती या ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. ग्रामीण भागात पकड असल्यास लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अधिक सोपे जाते. यामुळेच राजकीय नेतेमंडळींसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. राजकीय पक्ष आपापली पॅनेल तयार करून िरगणात उतरतात. तरीही सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असा दावा करण्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. यंदाही सोमवारी निकालाच्या दिवशी ते अनुभवास येईल.

’ निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती : २३५३

’ एकूण जागा : २०,५७२

’ सरपंचपदे : २३५३

’ पोटनिवडणुका : ३०८०

’ संरपंच पोटनिवडणूक : १३०