मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी व पूरपरिस्थिती असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सोमवारी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भाजपची भूमिका असून सध्या त्या पुढे ढकलल्यास आरक्षण लागू करण्यास वेळ मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने अचानक २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत काही निवडणुका जाहीर केल्या. सध्या पावसाळा असून राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे.