वाढत्या भारनियमनामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. मात्र ‘आयआयटी मद्रास’मधील एका प्राध्यपकाने वीजप्रवाहावर संशोधन करून भारनियमनावर उपाय शोधून काढला आहे. वीजप्रवाहावर नियंत्रण आणून वीजेचा वापर कमी होऊ शकतो. परीणामी भारनियमनापासून मुक्तता होऊ शकते.
संस्थेतील प्राध्यापक अशोक झुनझुनवाला, भास्कर राममूर्ती आणि त्यांच्या टीमने मिळून संशोधन पूर्ण केले आहे. यामध्ये त्यांनी सध्या होणारा पर्यायी विद्युतप्रवाहाचे रूपांतरण थेट विद्युत प्रवाहामध्ये केले. यामध्ये वीजपुरवठा कमी दाबाने सोडण्यात येतो आणि घरातील महत्त्वाच्या गोष्टी वापरता येऊ शकतात. याची उपकरणे सध्या विविध घरांमध्ये बसविण्यात आली आहेत. या उपकरणाच्या माध्यमातून पर्यायी विद्युतप्रवाह थेट विद्युतप्रवाहामध्ये वळविला जातो. या प्रवाहावर घरातील विद्युत उपकरणे वापरता येऊ शकतात.
भारनियमनावर थेट विद्युतप्रवाहाचा उतारा
वाढत्या भारनियमनामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. मात्र ‘आयआयटी मद्रास’मधील एका प्राध्यपकाने वीजप्रवाहावर संशोधन करून भारनियमनावर उपाय शोधून काढला आहे.
First published on: 02-02-2014 at 04:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electronic solution on load shedding