भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो अनुयायी मुंबईत पोहोचले. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आझाद मैदानात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. भिडे गुरुजी यांना आठ दिवसांत अटक करा, असा अल्टिमेटमच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करून येताना आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांची चिथावणी असल्याचे समोर आले. या प्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांना अटक केली असली तरी संभाजी भिडे यांना अद्याप अटक झालेली नाही. संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी. ही मागणी पूर्ण झाली नाही तर २६ मार्चलाच मुंबईवर मोर्चा काढू आणि भिडे यांच्या अटकेपर्यंत मुंबई ताब्यात घेऊ असाही इशारा प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता.

आंबेडकर यांच्या इशाऱ्यानंतर अजूनही संभाजी भिडे यांना अटक झालेली नाही. त्यामुळे आज मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून लोक मोर्चासाठी मुंबईत पोहोचले आहेत. भायखळा येथील उद्यानापासून हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मोर्चामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती.

दुपारी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली. सरकारने कोर्टाचे काम करु नये, भिडे गुरुजींना नरेंद्र मोदींची फूस आहे, अशी टीका त्यांनी केली.

Update:

> मोदींसारखा फक्त सेल्फी काढू नका: प्रकाश आंबेडकर

> मुख्यमंत्र्याचे भारिपच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण, दुपारी घेणार भेट

> सविस्तर वाचा: संभाजी भिडे सरकारचे जावई आहेत का? : प्रकाश आंबेडकर

> सीएसटीएम स्थानकात बाहेरगावातून येणारे आंदोलक पोहोचले. संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी

> संभाजी भिडेंना अटक झाली पाहिजे, आंदोलकांची घोषणाबाजी

> भिडे गुरुजींना अजून अटक का नाही?, भिडे गुरुजी सरकारचे जावई: प्रकाश आंबेडकर

> प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात पोहोचले.

> मोर्चासाठी आलेले कार्यकर्ते

> मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

> मोर्चासाठी कार्यकर्त्यांची सीएसटीएमजवळ गर्दी