लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नीट परीक्षेतील पर्सेंटाईल कमी करण्याचा निर्णय राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने घेतल्यानंतर आयुष मंत्रालयानेही आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक गुणांची पात्रता १५ पर्सेंटाईलने शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तिसरी मुक्त फेरी रद्द करून नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
आयुष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत किमान ५० पर्सेंटाईल मिळवणे आवश्यक असते. मात्र आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी अभ्यासक्रमाच्या नियमित व मुक्त फेऱ्यानंतरही अनेक राज्यांमध्ये जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे आयुष मंत्रालयाने तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता असलेल्या ५० पर्सेंटाईलची मर्यादा ३५ पर्सेंटाईल किंवा ११२ गुणांपर्यंत कमी केली आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा २५ पर्सेंटाईल किंवा ८७ गुणांपर्यंत तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ३० पर्सेंटाईल किंवा ९९ गुणांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पात्रता निकष शिथील करण्याच्या आयुष मंत्रालयाच्या निर्णयामुळे नीट परीक्षेत ३५ पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा-मुंबई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनस येथून ४२ लाख जप्त
नव्याने वेळापत्रक जाहीर
आयुष मंत्रालयाने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तिसरी मुक्त फेरी रद्द करून नव्याने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज नोंदणी व शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
असे आहे वेळापत्रक
नव्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची २२ नोव्हेंबर रोजी गुणवत्तायादी, तसेच जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. २३ ते २४ नोव्हेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या मुक्त फेरीमध्ये पसंतीक्रम भरले आहेत. त्यांनाही पुन्हा पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. तिसऱ्या मुक्त फेरीसाठी २६ नोव्हेंबर रोजी निवड यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
आणखी वाचा-पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजपा नेते विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तिथे…”
जागा रिक्त राहिल्यास
तिसऱ्या मुक्त फेरीनंतर जागा रिक्त राहिल्यास चौथी मुक्त फेरी ३ ते ८ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येईल. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास फेरी राबविण्याबात निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.