घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर ओळखीच्याच एका तरुणाने बलात्कार केल्याची तक्रार छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या तरूणास अटक केली असून हा गुन्हा मरीन ड्राइव्ह परिसरात घडल्यामुळे त्या पोलीस ठाण्याकडे आरोपीला शनिवारी रात्री सुपूर्द करण्यात आले आहे.
ही तरुणी अल्पवयीन असून ती घरातून पळून आली आहे. काही दिवस तिने तिच्या मुंबईतील नातेवाईकांकडे काढल्यावर तेथूनही ती पळून ती छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मुक्कामास आली. तेथे तिची ओळख एका मुलीशी झाली. त्या मुलीसोबत तिचा १९ वर्षांंचा एक मित्रही होता. पळून आलेल्या मुलीने या मुलीच्या घरी एक रात्र काढली. १६ जानेवारीस या मित्राने त्या मुलीस मरीन ड्राइव्ह येथे नेले. तेथे त्याने तिचा उपभोग घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे भटक्या मुलांसाठी काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी या मुलाने संपर्क साधला आणि त्या मुलीला घरी परत पाठवावे, अशी विनंती केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यास सुरूवात केल्यावर त्या मुलीने आपल्यावर अत्याचार झाल्याचे त्या कार्यकर्त्यांना सांगितले.

Story img Loader