मुंबई : महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पेच निर्माण झाला असून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, या मागणीवर शिंदे ठाम असल्याने त्यांची समजूत काढण्यात येणार आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे.

महायुतीला भरभक्कम बहुमत मिळूनही दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकलेला नाही. शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. महायुतीने ही निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली व त्यांचा चेहरा जनतेसमोर होता. लाडकी बहीण व अन्य योजनांचे यश त्यांच्यामुळे असल्याने मुख्यमंत्रीपदावर शिंदे यांचा हक्क असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. दुसरीकडे भाजपला १३२ जागा मिळाल्या असून सहा-सात अपक्ष व लहान पक्षांचा भाजपला पाठिंबा आहे. विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४५ आकड्याच्या भाजप अतिशय जवळ आहे. भाजपकडे १२२ आमदार असतानाही २०१४ मध्ये सरकार स्थापन केले होते. शिंदे यांना शिवसेनेतून फुटल्याबद्दल २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपद देण्यात आले. आता पुन्हा शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास भाजपमध्येही तीव्र नाराजी निर्माण होईल. भाजप व फडणवीस यांनीच नेहमी त्याग का करावा, आता शिंदे यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद घ्यावे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

हेही वाचा >>>मला आई आणि बायकोनेही मतदान केले नाही का? दहिसरमधील मनसेच्या उमेदवाराचा ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर प्रश्न

शिंदे हा मराठा समाजातील चेहरा असून मनोज जरांगे हे सातत्याने आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. फडणवीस यांच्याबाबत मराठा समाजामध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा फटका बसेल का, याबाबतही भाजपच्या गोटात चाचपणी सुरू आहे. फडणवीस हे २०१४-१९ या काळात मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये यश मिळाले होते. मुंबई महापालिका निवडणुकीतही २०१७ मध्ये भाजपपेक्षा शिवसेनेला केवळ दोन जागा अधिक मिळाल्या होत्या. त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला कोणताही फटका बसणार नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून शिंदे, फडणवीस व पवार यांना नवी दिल्लीत चर्चेसाठी बोलाविण्यात येणार असून त्यानंतरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिंदे यांची समजूत घालून मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल, असे सूत्रांनी नमूद केले. शिंदे यांची समजूत कशी काढावी हा भाजपपुढे मोठा प्रश्न आहे. महायुतीचा नेता निवड आणि नवीन सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा पुढील सोमवारी होण्याची शक्यता वर्तविली जाते. रविवारी अमावास्या असल्याने तो दिवस टाळला जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

Story img Loader