मुंबई : महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पेच निर्माण झाला असून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, या मागणीवर शिंदे ठाम असल्याने त्यांची समजूत काढण्यात येणार आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे.
महायुतीला भरभक्कम बहुमत मिळूनही दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकलेला नाही. शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. महायुतीने ही निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली व त्यांचा चेहरा जनतेसमोर होता. लाडकी बहीण व अन्य योजनांचे यश त्यांच्यामुळे असल्याने मुख्यमंत्रीपदावर शिंदे यांचा हक्क असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. दुसरीकडे भाजपला १३२ जागा मिळाल्या असून सहा-सात अपक्ष व लहान पक्षांचा भाजपला पाठिंबा आहे. विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४५ आकड्याच्या भाजप अतिशय जवळ आहे. भाजपकडे १२२ आमदार असतानाही २०१४ मध्ये सरकार स्थापन केले होते. शिंदे यांना शिवसेनेतून फुटल्याबद्दल २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपद देण्यात आले. आता पुन्हा शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास भाजपमध्येही तीव्र नाराजी निर्माण होईल. भाजप व फडणवीस यांनीच नेहमी त्याग का करावा, आता शिंदे यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद घ्यावे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>मला आई आणि बायकोनेही मतदान केले नाही का? दहिसरमधील मनसेच्या उमेदवाराचा ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर प्रश्न
शिंदे हा मराठा समाजातील चेहरा असून मनोज जरांगे हे सातत्याने आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. फडणवीस यांच्याबाबत मराठा समाजामध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा फटका बसेल का, याबाबतही भाजपच्या गोटात चाचपणी सुरू आहे. फडणवीस हे २०१४-१९ या काळात मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये यश मिळाले होते. मुंबई महापालिका निवडणुकीतही २०१७ मध्ये भाजपपेक्षा शिवसेनेला केवळ दोन जागा अधिक मिळाल्या होत्या. त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला कोणताही फटका बसणार नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून शिंदे, फडणवीस व पवार यांना नवी दिल्लीत चर्चेसाठी बोलाविण्यात येणार असून त्यानंतरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिंदे यांची समजूत घालून मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल, असे सूत्रांनी नमूद केले. शिंदे यांची समजूत कशी काढावी हा भाजपपुढे मोठा प्रश्न आहे. महायुतीचा नेता निवड आणि नवीन सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा पुढील सोमवारी होण्याची शक्यता वर्तविली जाते. रविवारी अमावास्या असल्याने तो दिवस टाळला जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.