उन्हाळी सुटीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी वातानुकूलित डबलडेकर गाडी अजिबातच चालणार नसली, तरी त्याची भरपाई मध्य रेल्वेने तात्काळ विशेष गाडी चालवून केली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही तात्काळ विशेष गाडी कोकणासाठी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या दरम्यान मध्य रेल्वे ९, १०, १६, १७ मे या दिवशी दोन तात्काळ विशेष गाडय़ांच्या आठ फेऱ्या चालवणार आहे. या गाडय़ांची आरक्षणे आज, ८ मे रोजी खुली होतील. ही तात्काळच्या तिकिटांच्या दरांत खरेदी करावी लागतील.
०१००५ डाऊन तात्काळ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ९ मे व १६ मे रोजी रात्री ००.४५ मिनिटांनी रवाना होईल. ही गाडी मडगावला त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल, तर ०१००६ अप ही तात्काळ विशेष गाडी ९ व १६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता मडगावहून निघून त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर, ०१०४५ डाऊन तात्काळ विशेष गाडी १० व १७ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ०१.१० मिनिटांनी निघून त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. ०१०४६ अप ही गाडी १० व १७ मे रोजी दुपारी ४.०० वाजता मडगावहून निघून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
प्रवासातील थांबे
’ ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल.
’ या गाडीत वातानुकूलित टू-टीयर एक डबा, वातानुकूलित थ्री-टीअरचे तीन डबे, शयनयान श्रेणीचे सात डबे आणि साधारण श्रेणीचे सहा डबे असतील.
श्रेणी तिकीट दर
वातानुकूलित टू-टिअर १९४० रु.
वातानुकूलित थ्री-टिअर १३४० रु.
शयनयान श्रेणी ४९५ रु.
द्वितीय श्रेणी आसन २४० रु.